ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी बारामतीमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय... ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा होणार आहे... मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी होण्याचं लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बांधवांना आवाहन केलंय.. सकाळी १० वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. बारामतीच्या शारदा प्रांगणपासून मोर्चा निघून तहसील कार्यालयावर धडक देईल