Kolhapur| गर्भलिंग चाचणी रॅकेटवर मकोका, गर्भलिंग चाचणी, गर्भपात प्रकरणी पहिल्यांदाच मकोकाची कारवाई

कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, राज्यातील अशा स्वरूपातील ही पहिलीच कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणातील म्होरक्या स्वप्निल पाटीलसह ११ जणांवर कारवाई करण्यात आली असून, गेल्या दहा वर्षांत या टोळीने ११ गुन्हे केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मकोका प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करवीर पोलिसांकडून सुरू आहे. MCOCA on gender testing racket, MCOCA takes action for the first time in gender testing, abortion case #MCOCA #gendertestingracket #NDTVMarathi

संबंधित व्हिडीओ