हिंगोली जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने याचा थेट परिणाम पेरणी पूर्व शेती मशागतीच्या कामांवर होताना दिसून येत आहे, मान्सून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय मात्र ट्रॅक्टर द्वारे शेतीतील केली जाणारी पूर्व मशागतीची कामे खोळंबल्याच चित्र हिंगोली जिल्ह्यात दिसून येत आहे.दरम्यान संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी..