कोल्हापुरात पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावर हळूहळू परिणाम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याचे फलक लागले आहेत.. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील काही पेट्रोल पंपांवर देखील हीच परिस्थिती आहे.पेट्रोलचा पुरवठाच झाला नसल्यामुळे अनेक वाहनधारकांना मानसिक त्रास होत असल्याचे चित्र आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी