हिंगोली जिल्ह्यात बहुतांश भागांमध्ये सध्या तूर कापणीच्या कामांची लगबग सुरू आहे. त्याबरोबरच कापणी झालेल्या तुरीची मळणी यंत्रातून काढणी देखील केली जातेय. मात्र यावर्षी सततचे ढगाळ वातावरण, धुकं आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे तुरीच्या उत्पादनात चांगलीच घट झाली आहे.