अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या युद्धनीतीमुळे नगर मनमाड महामार्गाचे काम रखडल्याचा दावा भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी एका कार्यक्रमादरम्यान केला होता.. सुजय विखे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी समाचार घेतलाय. ट्रम्प यांना पीएची गरज असेल तर सुजय विखेंना घेऊन जा असा टोला लंके यांनी लगावलाय.