Pandharpur| मांडवेत रंगलं महिलांचं युद्ध, 300 वर्षांची परंपरा; युद्धाने जपली जाते अनोखी परंपरा

पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातील एक अनोखी प्रथा सध्या चर्चेचा विषय ठरलीय. वृंदावनमध्ये तुम्ही लठमार होळी पाहिलीच असेल इथे महिला पुरषांना लाठीने मारतात.. तशीच प्रथा माळशिरसमधील मांडवे गावात साजरी केली जाते.. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी दोन गटातील महिला एकमेकांसमोर येत युद्ध करतात. यामध्ये गावातील पुढाऱ्यांना देखील युद्धाचा प्रसाद हा मार खाऊन मिळतो. मांडवे आणि फोडशीरस या दोन गावातील महिला गावच्या वेशीवर येऊन एकमेकांशी युद्ध करतात. तीनशे वर्षांपूर्वी नागायन आणि भागायन या 2 महिलांनी युद्ध केले होते. याच देवतांच्या युद्धाच्या स्मृती नागपंचमीला महिला जागवतात. आणि युद्ध करतात. कसे आहे महिलांचे युद्ध... याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी...

संबंधित व्हिडीओ