Wardha FDA Raid| FDA ची धडक कारवाई, Domino's आणि जय कृष्णा बेकरीचा परवाना निलंबित

वर्ध्यात अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन खाद्य आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. डोमिनोज पिझ्झा आणि जय कृष्णा बेकरी या आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान अन्नपदार्थ तयार करण्याच्या परिसरात आवश्यक स्वच्छता नसणे, अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पॅकेजिंग साहित्याची आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध नसणे, कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे, पिण्याच्या पाण्याची तपासणी प्रमाणपत्र उपलब्ध नसणे तसेच पेढीत माशांचा प्रादुर्भाव आढळून आला. संबंधित आस्थापनांना सुधारणा करण्यासाठी १५ दिवसांची नोटीस देण्यात आली होती. मात्र, निर्धारित कालावधीत समाधानकारक पूर्तता अहवाल सादर न केल्याने अन्न परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत.

संबंधित व्हिडीओ