गणेशोत्सव अवघ्या काही आठवड्यावर येऊन ठेपलाय. मात्र आगमन सोहळे 15 तारखेपासून मुंबईत सुरु झाले आहेत. या उत्सवा दरम्यान ज्या मोठ्या मुर्ती आहेत त्यांना घेऊन जात असताना वाटेत लागणारे एल आकाराचे सिग्नल अडथळ्याचे ठरत आहेत. त्यामुळे गणेशोत्सव समन्व्य समितीने वाहतूक आयुक्त यांना पत्र लिहिलं आहे. आगमन सोहळ्यादरम्यान संबंधित मार्गांची आगाऊ पाहणी करून ही संरचना तात्पुरत्या स्वरूपात हटवण्याची मागणी समितीने केलीये..