सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार, सिंधुदुर्गात Taj Hotel चा मार्ग मोकळा

सिंधुदुर्गवासियांनी १९९४ पासून पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. बहुप्रतिक्षित ताज हॉटेलचा मार्ग आज मोकळा झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथे ताज हॉटेल उभारण्यासाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी झाल्याने, सिंधुदुर्गाला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या दिशेने आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड , महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि स्थानिक जमीनदारांच्या प्रतिनिधी मंडळात हा करार झाला, ज्यामुळे या बहुप्रतिक्षित महत्त्वाच्या लक्झरी हॉस्पिटॅलिटी प्रकल्पाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

संबंधित व्हिडीओ