Latur जिल्ह्यात यंदा पावसाचं प्रमाण कमी, चिंतेचं वातावरण, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत खास बातचीत

लातूर जिल्ह्यात दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष परतीच्या पावसाकडे लागले आहे. यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मांजरा धरणासह लातूर जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या धरणांमधून होणारा पाण्याचा उपसा बंद करण्यात आला आहे. सध्या केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर लातूरचे जिल्हाधिकारी भारत भास्केवाड यांच्याशी आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी बातचीत केलीये...

संबंधित व्हिडीओ