नागपूर जिल्ह्यातील एका निवासी आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थ्यांशी गैरवर्तन झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. आश्रमशाळेतील तीन विद्यार्थ्यांशी लैंगिक गैरप्रकार केल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आश्रमशाळेत काम करणारा शिपाई राजेश मालापुरे याला पोलिसांनी अटक केली आहे. विद्यार्थ्यांनी धाडसाने तक्रार केल्यानंतर शाळा प्रशासन, बाल संरक्षण यंत्रणा आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.