Chakan च्या वाहतूक कोंडीचा शाळकरी मुलांना फटका, सातवीच्या विद्यार्थ्याचं मोदी, गडकरींना पत्र

चाकणमधील वाहतूक कोंडी आता केवळ रस्त्यावरची समस्या राहिलेली नाही, तर त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या मानसिकतेवर आणि कुटुंबांच्या सुरक्षिततेवर होतोय.. सातवीत शिकणारा मयुरेश खोले वाहतूक कोंडीत तब्बल सात ते आठ तास अडकून रात्री साडेबारा वाजता घरी पोहोचला. मुलगा वेळेवर घरी न परतल्याने खोले कुटुंबीय अक्षरशः दहशतीखाली होते. या अनुभवाने व्यथित झालेल्या मयुरेशने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून ‘मोदी आजोबा, गडकरी आजोबा, चाकणची वाहतूक कोंडी सोडवा,’ अशी आर्त विनंती केली आहे. या चिमुकल्याच्या पत्रातून चाकणच्या वाहतूक कोंडीचं विदारक वास्तव समोर आलं आहे. या खोले कुटुंबीयांशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी..

संबंधित व्हिडीओ