नवी मुंबईत 'रेड अलर्ट'! भारतीय हवामान खात्याने आज पहाटेपासून ठाणे जिल्ह्यासह काही भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन नवी मुंबई पालिका प्रशासन, NDRF, SDRF आणि लष्कर पूर्णपणे सज्ज आहे. पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नागरिकांना घाबरू नका, सतर्क राहा आणि प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन केले आहे.