मुंबईतील मोहर्रमच्या वेळी गोळ्या वाटणाऱ्या फैय्याज प्रेमजी बद्दल एक नवी माहिती समोर आलीय.. फैय्याज प्रेमजीच्या ईमेलमधून ही माहिती उघड झाली.. देशातील शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था वाईट असल्याचं त्यात नमूद आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील ईमेलमध्ये उल्लेख आहे.. इराण-इस्रायल देशांनी युद्ध करू नये असंही त्याच्या मेलमधून समोर आलं. तर देशातील कुप्रथेबाबतही उल्लेख आढळला आहे.. मात्र हा इमेल त्याने इतर कोणालाही पाठवला नव्हता, त्याने तो इमेल त्याच्या ड्राफ्ट बॉक्समध्ये ठेवलेला होता.. अशी माहिती मिळतीय... फैय्याज प्रेमजी हा जगभरातील वाईट रूढी परंपरा दूर व्हाव्यात यासाठी UNO कडे देखील गेला होता, मात्र त्याला तिथे प्रवेश मिळाला नाही, असंही कळतंय.