अयोध्या राम मंदिरातील देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. 18 जुलै रोजी नागपुरात रामरक्षा पठण आंदोलन आयोजित करण्यात आले असून, या आंदोलनात उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होणार आहेत. कार्यक्रमासाठी रामनगर येथील राम मंदिरात परवानगी न मिळाल्याने आता पर्यायी स्थळांचा शोध सुरू आहे.