NDTV मराठीच्या मोहिमेला यश, इगतपुरीमधील 9 हल्लेखोरांना अखेर अटक; याचसंदर्भातले अधिकचे अपडेट्स

पर्यटकांचा पाठलाग आणि मारहाण प्रकरणात इगतपुरी पोलिसांनी अखेर 9 आरोपींच्या मुसक्या आवळल्यात.तर तीन आरोपी अजून फरार आहेत.. फरार आरोपींपैकी आकाश भोईरवर याआधी हत्येचा गु्न्हा दाखल असल्याची माहिती समोर आलीय.NDTV मराठीने या प्रकरणाची बातमी लावून धरल्यानंतर 9 हल्लेखोरांना अटक करण्यात आलीय.. इगतपुरीच्या भावली धबधबा परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या नाशिकमधील भागवत कुटुंबावर स्थानिक टवाळखोरांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली होती. स्थानिक गुंडांच्या टोळक्याने पर्यटकांचा तब्बल 10 ते 15 किलोमीटरपर्यंत पाठलाग करत कारची तोडफोड केली होती आणि मारहाणही केली होती.

संबंधित व्हिडीओ