श्रद्धा वालकरच्या हत्येने संपूर्ण देश हादरला होता. लिव्ह इनमध्ये राहात असलेल्या तिच्या पार्टनरने म्हणजेच आफताब पूनावालाने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून आफताबने फ्रीजमध्ये ठेवले होते, असं पोलीस तपासात दिसून आलं होतं. हे तुकडे आफताबने दिल्लीतील जंगलात फेकून दिले होते. या हत्याकांडाला 4 वर्षांहून अधिकचा काळ उलटून गेलाय. मात्र अजूनही श्रद्धाचे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आफताबने वेगवेगळी कारणे देत खटला लांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे. आफताब पूनावाला विविध कारणे देत खटल्याला विलंब लावत असल्याचा आरोप श्रद्धाच्या कुटुंबीयांनी केला आहे. श्रद्धाची आत्या राजल नाईक यांच्याशी याचसंदर्भात आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी बातचीत केली.