आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात 15 जुलैपासून ते 29 जुलै पर्यंत मटन आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.. वारकरी सांप्रदायात मांसाहार वर्ज्य मानलं जातं.. याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेता पंढरपूरचे प्रांताधिकारी आणि दंडाधिकारी सचिन इथापे यांनी मांस मटन बंदीचा आदेश जारी केलाय.. महत्त्वाचे म्हणजे पहिल्यांदाच वारीकाळात 15 दिवस मटन आणि मांस विक्रीचे दुकाने बंद असणार आहेत.