एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या ठाण्यातील टेंभी नाका परिसरात गुजराती बॅनर्स लागलेत.कच्छी समाजाच्या 'आषाढी बीज' अर्थात नववर्षानिमित्त गुजराती भाषेतील स्वागत बॅनर लावण्यात आला आहे.बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, फडणवीस, शिंदेंचा फोटो आहे.मात्र अजित पवार गटाच्या एकाही नेत्याचा बॅनरवर फोटो नसल्याने चर्चा रंगल्यात.दरम्यान या मुद्द्यावरून शिवसेना भूमिका घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..