गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने मोठी ओढ दिली आहे. त्यामुळे आषाढी वारी सोहळ्यातही पावसात भिजण्याचा आनंद वारकऱ्यांना मिळत नाही. अशावेळी वारकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी होऊ नये आणि पाऊस नसला तरी वारकऱ्यांना भिजण्याचा आनंद मिळावा यासाठी कृत्रिमपणे पाण्याचे फवारे मारण्यात आलेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यावेळी रोटी घाटात भिजण्याचा आनंद लुटणाऱ्या वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी....