राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त माजलगाव विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर्स झळकले आहेत. या बॅनर्सवर धनंजय मुंडेंचा 'भावी कॅबिनेट मंत्री' असा उल्लेख करण्यात आलाय.. त्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. माजलगाव शहरासह परिसरातील प्रमुख चौकांमध्ये हे बॅनर्स लावण्यात आलेत.. शुभेच्छुक म्हणून ऊसतोड कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष ब्रम्हगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल राधे कांबळे यांचे नाव आहे. बॅनर्सवरच्या या मजकुरामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच मुंडेंच्या मंत्रिपदाच्या चर्चांनाही वेग आला आहे.