Nandurbar पाण्याची स्थिती अतिशय गंभीर, तीन प्रकल्पात शून्य टक्के पाणी; सहा लघु प्रकल्पांनी गाठला तळ

नंदुरबार जिल्ह्यात पाण्याची स्थीती अतिशय गंभीर झालीय.नंदुरबारच्या 3 प्रकल्पात शून्य टक्के पाणी आहे. 13 लघु प्रकल्पांपैकी सहा लघु प्रकल्पांनी तळ गाठला असून लघु प्रकल्पांमध्ये 28.98% पाणीसाठा शिल्लक आहे.येणाऱ्या काळात ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते.त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यात तापमान 43ते44° c च्या वरती जात असल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढलाय.त्यातून धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे..

संबंधित व्हिडीओ