महाराष्ट्रातील धरणं आणि मोठे, मध्यम व लघु अशा २ हजार ९९७ सिंचन प्रकल्पात अवघा ३३.३७ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.तापमानाचा पारा वाढत असून, एप्रिलपेक्षाही मे महिन्यात अधिक उष्णतेच्या झळा बसत आहेत. त्यामुळे प्रकल्पांतील पाणी पातळी आणखी खालावली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे टँकरचा आकडा देखील वाढत आहे. राज्यातील १९ जिल्ह्यांतील ७५८ गावं आणि २,२५७ वाड्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ५७ शासकीय आणि ८७९ खासगी टॅकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.तर हा आकडा वाढण्याचा देखील शक्यता आहे.