Global News| ISRO ने मध्यरात्री रचला इतिहास, देशाचा पहिला Imaging satellite लॉन्च

ISRO ने एक नवा इतिहास रचला आहे...आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रगत 'अर्थ ऑब्झर्वेशन स्पेसक्राफ्ट' यशस्वीरीत्या लॉन्च केलं..'जिओ-ऑर्बिट'मध्ये प्रक्षेपित केलेला हा देशाचा पहिलाच इमेजिंग सॅटेलाइट आहे.... श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रावरून GSLV रॉकेटच्या साहाय्याने याचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं.EOS-05 सॅटेलाइटने उड्डाण केल्यानंतर अवघ्या १८ मिनिटांत ठरलेल्या 'सब-जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट'मध्ये यशस्वी प्रवेश केला. 'जिओसिंक्रोनस ऑर्बिट'मधून म्हणजेच सुमारे ३६,००० किलोमीटर उंचीवरून प्रतिमा टिपण्यासाठी तयार करण्यात आलेला हा भारताचा पहिलाच उपग्रह आहे.हा उपग्रह भारत आणि त्याच्या आसपासच्या विस्तीर्ण प्रदेशांच्या प्रतिमा सातत्याने टिपण्यास सक्षम असेल.दरम्यान ज्या GSLV द्वारे हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलाय त्याला त्याच्या बेभरवशी कामगिरीमुळे शास्त्रज्ञांनी नॉटी बॉय असं टोपण नाव दिलंय. मात्र याच नॉटी बॉयनं भारतासाठी आज जबरदस्त कामगिरी केलीय.

संबंधित व्हिडीओ