छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये जैन समाज मोर्चा काढणार आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकाळी १० वाजता महावीर जैन मंदिर, राजा बाजारमधून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जैन समाजाचा मोर्चा निघेल. पुण्यातील एचएनडी हॉस्टेल जमीन विक्रीत घोटाळा झाल्याच्या आरोपावर जैन समाजाचा भव्य मूक मोर्चा असणार आहे.आज राज्यातील तीन जिल्ह्यात जैन समाजाचा मोर्चा निघणार आहे... संभाजीनगरात मोर्चाला सुरुवात झाली आहे.