जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केलीय. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांशी गुलाबराव पाटलांनी संवाद साधलाय. गोरक्ष गंगा नदीच्या पुरात वाहून मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांचीही गुलाबराव पाटलांनी सांत्वन भेट घेतलीय. तर मृत तरुणाच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत देण्यात आलीय