जुहूतील एकाच रस्त्यावर असलेल्या पाच गार्डन्समुळे येथील नागरिकांची चांगलीच कोंडी झाली आहे. रस्त्याच्या दुभाजक म्हणून वापरल्या जाणाऱ्या या उद्यानांमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून, याच ठिकाणी उड्डाण पूल आणि मेट्रोचे काम सुरू असल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली असून, लोकांना तासनतास वाहतूक कोंडी आणि मोठ्या प्रमाणात धुळीचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी तीव्र मागणी केली आहे की, काम पूर्ण होईपर्यंत तातडीने हे गार्डन्स काढावेत, जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल व नागरिकांचा त्रास कमी होईल. प्रशासनाने यावर लवकर तोडगा काढण्याची गरज आहे. आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी योगेश माने यांनी....