लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या VIP दर्शन व्यवस्थेवरून सुरू असलेल्या वादाची राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आज झालेल्या सुनावणीत आयोगाने पोलीस प्रशासन आणि संबंधित पक्षांना कडक ताकीद दिली. विशेषतः काही स्वयंसेवकांकडून भक्तांशी, विशेषतः महिला भक्तांशी होत असलेल्या कथित गैरवर्तनाबाबत आयोगाने तीव्र चिंता व्यक्त केली. दरम्यान, महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी सुनावणीला गैरहजर राहिल्याची नोंदही आयोगाने घेतली असून, या प्रकरणाची अंतिम सुनावणी आता 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे.