CBD Belapur सेक्टर-5 इथं दरड कोसळली, RBI कॉलनीजवळ मातीचा ढिगारा; याचसंदर्भातले NDTV वर LIVE Updates

मुसळधार पाऊस आणि सतत सुरू असलेल्या पावसामुळे सीबीडी बेलापूर सेक्टर-5 येथील आरबीआय कॉलनीजवळ मेट्रोच्या पिलरलगत दरड कोसळण्याची घटना घडली.. डोंगराचा काही भाग खचल्याने मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि अन्य ढिगारा थेट रस्त्यावर आला. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे... घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पूरकडून खारघरच्या दिशेने जाणारी वाहतूक तात्पुरती वळविण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. रस्त्यावर पडलेला माती व दगडांचा ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून परिसर सुरक्षित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीय.

संबंधित व्हिडीओ