हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय यांचे नातेवाईक आणि सहकारीचा मारहाणीचा व्हिडिओ समोर आला. धनंजय देशमुख यांच्या नातेवाईकांकडूनच एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. रक्तबंबाळ होईपर्यंत या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचं कळतंय. दादा खिणकर असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीच नाव आहे. घरगुती कारणावरून मारहाण झाल्याची माहिती कळते आहे.