मुंबईत पुन्हा हवेच्या प्रदूषणाची नोंद झाली.एकीकडे तापमान वाढ होत असताना अचानक मुंबईची हवाही प्रदूषित झाली.मुंबईत देवनार, मालाड पश्चिम आणि बीकेसीमध्ये सर्वात प्रदूषित हवा असल्याचं समोर आलंय. मुंबईकरांवर उष्णतेच्या लाटेसह आता प्रदूषणवाढीसह आजारांचे संकट वाढले आहे.अचानक वाढलेला उकाडा आणि प्रदूषणामुळे आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी 'एअर क्वालिटी इंडेक्स' 'एआयक्यू' तपासला जातो. यामध्ये 0 ते 50 पर्यंत 'एक्यूआय' 'अतिशय शुद्ध हवा' मानली जाते.