आज रविवार असल्याने मुंबईच्या लालबाग परिसरात वेगवेगळ्या गणेश मंडळामध्ये दर्शन करण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. संपूर्ण देशभरातून मोठ्या संख्येने गणेशभक्त लालबागचा राजाचा दर्शन करण्यासाठी आणि या परिसरातील वातावरण अनुभवण्यासाठी येत असतात. त्यातच शनिवार रविवार असल्यामुळे गर्दी आणि तिलाच वाढली आहे. एखाद्या जत्रेपेक्षाही मोठं स्वरूप या संपूर्ण परिसराला आलं आहे.
Big queue for Lalbaugcha Raja darshan due to Sunday