Akola मध्ये पेट्रोलसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा; त्रस्त झालेल्या प्रवाशांची प्रतिक्रिया काय?

अकोला जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत... जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे... तीव्र उन्हाच्या झळा आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे गावाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने इंधनाची मागणीही वाढली आहे... पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांना तब्बल एक तास प्रतीक्षा करावी लागत असून, काही ठिकाणी मर्यादित इंधन दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे... डिझेलचीही अशीच परिस्थिती असल्याने मालवाहतूक आणि प्रवासी वाहन चालक त्रस्त झाले आहेत.

संबंधित व्हिडीओ