खातेवाटपासंदर्भातली शपथविधी झाल्यावर आज जवळपास आठवड्याभरानंतर मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. गृहखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहणार आहे अर्थ खातं अजित पवारांकडे राहील तर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम खाते देण्यात आलेलं आहे. गृहनिर्माण खातं देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे धनंजय मुंडे यांचं कृषी खातं माणिकराव कोकाटेंकडे देण्यात आलंय तर धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा खातं देण्यात आलंय हे खातं पूर्वीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांकडे होतं. आदिती तटकरे यांच्याकडे महिला बालविकास आणि उदय सामंत यांच्याकडे उद्योग खाती देण्यात आलेली आहेत. त्यांच्याकडची खाती कायम ठेवण्यात आलेली आहेत.