राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत असल्याची चिंता खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी राजकारण बाजूला ठेवून राज्याच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.