मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मराठवाडा या भागांत अजून काही तास तरी पावसाची तीव्रता कायम राहणार ,असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे...समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव आता हळूहळू कमी होत असल्याने येत्या दोन दिवसांत पावसाला उघडीप मिळण्याची शक्यता आहे... मात्र, पुन्हा एकदा २ ऑक्टोबरपासून पावसाला सुरुवात होणार असून त्यावेळी पावसाची तीव्रता फारशी जास्त नसेल, असे पुणे वेधशाळेने स्पष्ट केले आहे.