दिवाळी किंवा दिवाळीनंतर राज्याच्या राजकारणात खांदेपालट होण्याची शक्यता असल्याचं मोठं विधान माजी मंत्री बच्चू कडू यांनी केलं आहे. दिवाळीत किंवा दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल,असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तसंच, मुख्यमंत्री यांनी अडीच-अडीच वर्षांच्या वाटपाबाबत कबूल केलं होतं, असा दावाही बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच आप्पांना मंत्री करा, असं विधान त्यांनी केलंय.त्यामुळे जळगावच्या संभाव्य मंत्रिपदाबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.