उद्या बीडमध्ये छगन भुजबळ यांची सभा होणारेय.ही सभा उधळून लावण्याचा इशारा देणाऱ्या मराठा आंदोलक गंगाधर काळकुटेंना पोलिसांनी नोटीस बजावली. बीडच्या शिवाजीनगर पोलिसांकडून काळकुटे यांना नोटीस बजावण्यात आली.भुजबळांच्या सभेपूर्वी आंदोलन करण्याचा इशाराही काळकुटेंनी दिला होता.