लोकल ट्रेनमध्ये झालेल्या क्षुल्लक वादात हत्या झालेल्या मयंक लोहारच्या वडिलांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरून संवाद साधलाय. मयांकच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि मयांकला न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिलीय. तर आरोपीला फक्त कठोर शिक्षा होणं पुरेसं नसून त्याला फाशीच दिली जावी, अशी मागणी मयांकच्या वडिलांनी केलीय.