MHADA lottery| घराचं स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाकडून 5285 घरांची लॉटरी,3 सप्टेंबरला सोडत | NDTV मराठी

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५,२८५ घरांसाठी ३ सप्टेंबरला सोडत होतेय. विरार- बोळींजसह अन्य ठिकाणच्या हजारो घरांची विक्री झालेली नाही.नसून या घरांच्या विक्रीसाठी प्रयत्न सुरू असताना मंडळाने आता नवीन घरांची सोडत काढली. या ५,२८५ घरांच्या सोडतीसाठीच्या नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला सोमवार, १४ जुलैपासून सुरुवात होणार आहे. तर इच्छुकांना १४ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहे.दरम्यान ३ सप्टेंबरला ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार आहे.

संबंधित व्हिडीओ