Mira Road Bakra Eid Rada| बकरा विरुद्ध डुक्कर वाद; बकरी ईदआधी मीरा रोडच्या सोसायटीमध्ये राडा

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मीरा रोडच्या पार्श्वभूमीवर राडा पाहायला मिळालाय. पूनम इस्टेट क्लस्टर 1 कॉम्प्लेक्समधल्या एका सोसायटीत बकरी ईदच्या आधी 25 बकरे आणून एक शेड उभारण्यात आली. यावरुनच वादाला तोंड फुटलं. ईदपर्यंत हे बकरे सोसायटीत ठेवण्याची तात्पुरती परवानगी मागितल्याचं सांगण्यात आलं. मात्र सोसायटीतल्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी कोणतीही अधिकृत बैठक न घेता ही शेड उभारल्याची परवानगी दिल्याचा आरोप हिंदू रहिवाशांनी कलाय. या तक्रारीची दखल घेत महापालिकेने तात्काळ ही शेड तोडली. मात्र शेड तोडल्यानंतरही बकऱ्या सोसायटी परिसरातचा असल्याने रात्रीच्या वेळी तणाव वाढला. यातच एका अज्ञाताने एका युवकावर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना घडली.

संबंधित व्हिडीओ