MNS Badlapur | मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरले, परप्रांतीय फेरीवाल्याला मनसैनिकांकडून चोप | NDTV

बदलापुरातील एका परप्रांतीयफेरीवाल्याला मनसैनिकांनी बेदम चोप दिल्याची घटना घडलीय. या परप्रांतीयाने मराठी भाषेला आणि माणसांना अपशब्द वापरले.बदलापूर पश्चिमेच्या स्टेशन भागात बसणारा हा फेरीवाला आहे. या फेरीवाल्यावर पालिकेकडून कारवाई केली जात असताना त्यांनी मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल शिवीगाळ करत अपशब्द वापरले. दरम्यान याची माहिती बदलापुरातील मनसैनिकांना मिळाल्यानंतर त्यांनी या परप्रांतीय फेरीवाल्याला बेदम चोप दिलाय. दरम्यान या मनसैनिकांनी हात जोडून या सगळ्या घडलेल्या प्रकारानंतर माफी मागितली.

संबंधित व्हिडीओ