सर्वसामान्य मतदारांचा रोष एक नोव्हेंबरच्या ' सत्याच्या मोर्चा' त दिसू द्या... राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिल्याची सूत्रांची माहिती. निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांसमोर मांडा असे आदेश राज ठाकरेंनी दिल्याचं कळतंय... निवडणूक आयोगाच्या चुकीच्या कार्यप्रणाली बाबत प्रेझेंटेशन माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत लोकांशी याबाबत उघडपणे बोला- असेही आदेश राज ठाकरेंनी दिल्याची माहिती मिळतेय