नागपूरच्या संविधान चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्यात आला. पेपर लीक प्रकरणी चौकशी व्हावी या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आज नागपुरात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा करिता संविधान चौकात विद्यार्थी एकत्र आलेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार आणि सचिव महेंद्र हरपळकर यांना पदमुक्त करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
Nagpur News | MPSC students' protest; demand for an inquiry into the paper leak case | Paper Leak Case