मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय, वाहतूक कोंडीत 4 ते 5 तास नागरिक अडकून पडलेयत या अडकलेल्या प्रवाशांना, वाहन चालकांना आता नजीकचे ग्रामस्थ मदतीसाठी सरसावलेयत.पेल्हार गावातील मुस्लिम बांधवांकडून पाणी, वेफर्स सरबत आणि इतर खाद्य पदार्थांचं वाटप केलंय.प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता मुस्लिम बांधवांनी सुरू केलेल्या उपक्रमातून एक सामाजिक सलोख्याचं दर्शन घडल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होतं. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी,