Mumbai-Pune Expressway गॅस टँकर अपघात प्रकरण | 7 सदस्यीय समिती 60 दिवसांत अहवाल सादर करणार

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या गॅस टँकर अपघातानंतर महामार्गाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच वाहतूक व्यवस्थापनावरही टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विशेष सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. समिती पुढील ६० दिवसांत सविस्तर अहवाल सादर करेल. त्यानंतर अहवालातील शिफारशींनुसार उपाययोजना राबविण्यात येतील. राज्यातील अत्यंत वर्दळीच्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास गॅस टँकर उलटला... टँकरमधील गॅस गळती थांबविणे आणि टँकर सुरक्षितरीत्या हटविणे हे मोठे आव्हान संबंधित यंत्रणांसमोर उभे राहिले. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल ३२ तास लागले. 32 तास महामार्गावर वाहनचालक वाहतूक कोंडीत अडकले होते.

संबंधित व्हिडीओ