कर्नाटकचे भाजपा आमदार लक्ष्मण सावदींनी धक्कादायक वक्तव्य केलं.तर मुंबईला कर्नाटकचा भाग करू असं सावदींनी वक्तव्य केलंय. बेलगावीमध्ये महाराष्ट्र काय मागत आहे, जर तुम्ही तुमचा अहंकाराचा खेळ सुरू ठेवला तर तुम्ही हे लक्षात ठेवावे की आमच्या भागातून निवडून आलेले आणि महाराष्ट्रात गेलेले लोक देखील आहेत. जर तुम्ही तुमचा अहंकाराचा खेळ सुरू ठेवला तर मुंबईला कर्नाटकचा भाग बनवण्याची परिस्थिती निर्माण होईल. कर्नाटकचे भाजपा आमदार लक्ष्मण सावदींनी अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय. सावदींच्या 50 पिढ्या आल्या तरी असं होऊ शकत नाही असं दानवे म्हणालेत