Nagpur Water Shortage| नागपुरात भूजल पातळी खालावली, नवीन बोअरवेल खणण्यावर तत्काळ बंदी

नागपूर जिल्ह्यातील वाढती पाणीटंचाई आणि झपाट्याने खालावणारी भूजल पातळी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण नागपूर जिल्ह्यात नवीन बोअरवेल खणण्यावर तसेच जुन्या बोअरवेलची खोली वाढवण्यावर तात्काळ प्रभावाने बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला असून तो खाजगी व्यक्ती, शेतकरी, गृहनिर्माण संस्था, उद्योग आणि व्यावसायिक आस्थापनांना लागू असणार आहे. मात्र सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी सरकारी विभागांमार्फत घेतल्या जाणाऱ्या बोअरवेलना सशर्त सूट देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. Nagpur Water Shortage | Groundwater levels in Nagpur have dropped; immediate ban on drilling new borewells.

संबंधित व्हिडीओ