Nanded Rain | नांदेडमध्ये मुसळधार पाऊस, लोहामध्ये पुराच्या पाण्यातून शेतकऱ्याची सुखरुप सुटका

नांदेडमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय. लोहा तालुक्यात एका शेतकऱ्याची सुखरुप सुटका करण्यात आलीय. पळशी गावातले शेतकरी आनंदा कोल्हे रात्री आपल्या शेताकडे निघाले होते. मात्र अचानक पुराचं पाणी वाढलं. त्यामुळे त्यांना जीव वाचवण्यासाठी झाडावर चढावं लागलं. कित्येक तास झाडावर अडकून पडलेल्या आनंदा कोल्हेंची स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने अखेर सुटका केली..

संबंधित व्हिडीओ